ताज्या घडामोडी

पक्षसंघटन बळकट करण्यासाठी झोकून देऊन कार्य करा : हेमंत गडकरी

Akola B7 News

पक्षसंघटन बळकट करण्यासाठी झोकून देऊन कार्य करा : हेमंत गडकरी

अकोला – आगामी काळात पक्षसंघटन बळकट करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवून मा. राजसाहेबांना अभिप्रेत असलेले कार्य करण्यासाठी सर्वांनी झोकून देऊन कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी केले. संपर्क अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अकोला दौऱ्यात स्थानिक विश्राम गृह येथे आयोजीत आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.सर्वप्रथम सदस्य नोंदणी वर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन आपापसातील सर्व हेवेदावे विसरून एकदिलाने कार्य करून जिल्हात मनसेची दखल घेण्याजोगी ताकद निर्माण करून मजबुत विरोधी पक्ष बनण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.सदर बैठकीस मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, पंकज साबळे, महानगर अध्यक्ष सौरभ भगत, राकेश शर्मा, जिल्हा सचिव ललित यावलकर, उपाध्यक्ष सतीश फाले, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड, सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष संजयजी पळसकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कराळे, शेख निसार, डॉ. प्रशांत लोथे, महिला आघाडीच्या सौ. प्रशांसा अंबेरे, सौ.गमे, विजय बोचरे, चंदू अग्रवाल, प्रसिद्धी प्रमुख प्रेम पाटील मगर इत्यादी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.