सिव्हील लाईन पोलिस स्टेशन, अकोला येथे महिला ठाणेदार म्हणून कार्यरत असलेल्या मालतीताई कायटे मॅडम यांच्या कर्तव्यदक्ष व प्रभावी कामगिरीमुळे परिसरातील गुन्हेगारीत लक्षणीय घट
Akola B7
अकोला : सिव्हील लाईन पोलिस स्टेशन, अकोला येथे महिला ठाणेदार म्हणून कार्यरत असलेल्या मालतीताई कायटे मॅडम यांच्या कर्तव्यदक्ष व प्रभावी कामगिरीमुळे परिसरातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या रुजू झाल्यापासून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक मजबूत झाली आहे. महिलांना पोलीस ठाण्यात सन्मानपूर्वक वागणूक मिळत असून त्यांच्या समस्या तत्परतेने ऐकून त्यांचे योग्य निराकरण केले जात आहे. त्यामुळे स्थानिक महिला व नागरिकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक महिला बचत गट तसेच परिसरातील अनेक महिलांनी सांगितले की, मालतीताई कायटे मॅडम या अत्यंत जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत असून, त्यांच्या कार्यामुळे महिलांना सुरक्षिततेची जाणीव झाली आहे. यापूर्वी परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले होते, मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात आले आहे. यामुळे सिव्हील लाईन पोलीस स्टेशनसाठी त्या योग्य ठाणेदार असल्याचेही नागरिकांचे मत आहे. या संदर्भात सौ. वृंदा अरुण भेंडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), माजी महिला सचिव जया तायडे, सुनंदा दाभाडे, डॉ. स्वेता भेंडे, तायडे ताई, रंजू गोंड, रेखा दिनेश चव्हाण, मालती सतीश चिकटे, फुंडसे मॅडम आदी महिलांनी आपले समाधान व्यक्त केले आहे. कर्तव्यनिष्ठा, तत्परता आणि संवेदनशीलतेच्या बळावर मालतीताई कायटे मॅडम यांनी सिव्हील लाईन्स परिसरात सकारात्मक बदल घडवून आणत महिलांसाठी सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण निर्माण केले आहे.