ताज्या घडामोडी

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून दिनांक 08/03/20260 ला मोठी उमरी परिसरामध्ये महाकाली मंदिर येथे बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे गृह उपयोगी किट चे वाटप करण्यात आले

Akola B7

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून दिनांक 08/03/20260 ला मोठी उमरी परिसरामध्ये महाकाली मंदिर येथे बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे गृह उपयोगी किट चे वाटप करण्यात आले यामध्ये कामगार कल्याण मंडळातील समिती सदस्य श्री संतोष बाभुळकर श्री श्याम राऊत व सौ सरला पुंडकर यांनी बांधकाम कामगार महिलांना गृह उपयोगी वस्तू व सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ सुनंदा श्रीराम नालट या होत्या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे प्रभागातील नवनियुक्त नगरसेविका सौ पल्लवी निलेश गावंडे सौ शिल्पा किशोर वरोकार व श्री संदिप शेगोकार हे होते . कार्यक्रमाकरिता सौ सुहासिनीताई धोत्रे सौ मंजुषाताई सावरकर व सौ समीक्षा ताई अनुप धोत्रे यांनी शुभेच्छा दिल्यात कार्यक्रम हा श्री रणधीर भाऊ सावरकर व महानगर अध्यक्ष श्री जयंत भाऊ मसने यांच्या मार्गदर्शनात भाजपा पूर्व मंडळ अध्यक्ष श्री संदीप भाऊ गावंडे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनात पार पडला. उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी शासनाच्या या योजनेचे कौतुक केले परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या शासनाच्या या योजना गोरगरिबांच्या हिताच्या असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्यात कार्यक्रमाचे संचलन सौ पल्लवीताई निलेश गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन समिती सदस्य सौ सरला पुंडकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री गोपाल पुंडकर श्री संतोष बाभुळकर संदीप भाऊ गावंडे यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला कार्यक्रमा करिता जयश्री गावंडे सौ प्रमिला जवंजाळ,सौ उज्वला थारकर, सौ पुनम वाघ,श्वेता विधाते, मदनकार ताई व महिला लाभार्थी व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.