व्यायामची मैत्री म्हणजे आरोग्याची खात्री
——— प्रमोद गवई
अकोला:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्वर्गीय सज्जन भाऊ तायडे यांच्या प्रेरणुतुन भिम शक्ती तरुण मंडळाने व्यायाम शाळेची उभारणी केली.
त्या व्यायाम शाळेचे उद्घाटन भंते पु.भंते सुमंगल महाथेरो (शिवणी)याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष भज्जनभाऊ तायडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता प्रमोद गवई,गौतम कंकाळ, भगवान उपरास,दिपक खोटरे, सुनील इंगोले, संतोष गवई,दिलीप वानखडे, सुदर्शन उपरास,सचीन कांबळे,आकाश संतोष गवई,भोला कंकाळ,विक्की कांबळे,राजु इंगळे, आकाश संजय गवई,दिपक गवई, दिनेश वाघमारे,रितेश मोरे,श्याम गवारगुरु, मनोज वाघमारे,सागर ढिसाळे, अर्जुन गवारगुरु एडवोकेट संदीप तायडे,
आशीष गवई, छोटु कांबळे,कुणाल सिरसाट,दिपक मोगरे,करण इंगळे,धम्मा घ्यारे,विलास वानखडे,अतुल रोटे, निखील निखाडे,विजय दोळे,सौरभ मोरे,रवि तायडे, यांच्यासह भिम शक्ती तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ता व नगरातील नागरिकउपस्थित होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ता प्रमोद गवई यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की व्यायाम केल्याने शरीर सदुड राहते.व्यायमाशी ज्याने मैत्री केली त्याची चांगल्या आरोग्याची खात्री असते.यानंतर संतोष गवई यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की युवकांने व्यायामाला प्रथम स्थान द्यावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नये कार्यक्रमाची सांगता प्रसादानी झाली.