ताज्या घडामोडी

विकास पर्व अकोला पूर्व करण्यासाठी इच्छाशक्ती पाठपुरावा शब्दाला किंमत तसेच त्यासाठी राज्य शासन केंद्र शासन विविध विभागामध्ये संपर्क करून जनतेला दिलेले शब्द कार्यकर्त्यांनी दिलेली शब्दपूर्ती आमदार रणधीर सावर कर करत असल्यामुळे जिल्ह्या त त्यांनी सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक करून नवीन दिशा देण्याचे काम

Akola B7 News

अकोला*विकास पर्व अकोला पूर्व करण्यासाठी इच्छाशक्ती पाठपुरावा शब्दाला किंमत तसेच त्यासाठी राज्य शासन केंद्र शासन विविध विभागामध्ये संपर्क करून जनतेला दिलेले शब्द कार्यकर्त्यांनी दिलेली शब्दपूर्ती आमदार रणधीर सावर कर करत असल्यामुळे जिल्ह्या त त्यांनी सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक करून नवीन दिशा देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांनी केले.

*अकोला महानगरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवर येथे नऊ विविध विकास कामांचे भूमिपूजन एक कोटी 85 लाख रुपयाचे लोकार्पण सोहळा आमदार रणधीर सावरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले* याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत मसने हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर शारदाताई खेडकर अमोल गोगे, विजय अग्रवाल सुनिता अग्रवाल, राजेश लुंगे विशाल इंगळे, प्राची काकडे अनिल मुरूम कार कपिल मुरूम कार विवेक भरणे, संदीप गावंडे, गोपाल मुळे, योगेश मानकर सजयगोडा, केशव हेडा आधी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रभाग 13 मधील मतदारांचा लोकसभा विधानसभा नगर महानगरपालिकेमध्ये भाजपावर विश्वास संपादन असल्यामुळे व या भागातील मूलभूत सुविधा हद्दवाढ, क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प असून लोकनेते संजय भाऊ धोत्रे स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांनी दिलेली शब्द पूर्तता मतदारांना दिलेल्या अभिवचन करण्यासाठी आपण कटिबद्ध असून खासदार अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा तसेच जनसंवाद सप्ताहामध्ये त्यांनी नागरिकाची सुसंवाद साधून भारतीय जनता पक्षाच्या इतिहास 75 वर्षाची वाटचाल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून केली. यावेळी विविध कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा जनतेच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यामध्ये

* सतीश गवई ते राजू गवळी ते श्री बाबाराव गवई यांच्या घरापर्यंत नाली व रस्ता बांधकाम करणे,*

* बाबाराव गवई ते निशांत राव ते पुरुषोत्तम भागवत यांच्या घरापर्यंत रस्ता रुंदीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजे किंमत ४५ लक्ष रुपये*

* गणेश गवई ते राजू गवई यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे*

* महेश शेगोकार ते विजय सरदार ते संजय ढोके यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे*

* भीमा गवळी ते पिकेव्ही पर्यंत नाला बांधकाम करणे*

* सुरेंद्र गवई ते ज्ञानदेव गवई ते भीमा वानखडे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे*

* अशोक वानखडे ते गौतम वानखडे ते रमेश इंगळे ते पंकज पाखरे यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे*

* MH-53 ते कब्रस्तान ते निशांत राव ते तायडे यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीट करणे*

* शरद वानखडे ते भिमराव वानखडे रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण करणे*

*अंदाजे किंमत ६५ लक्ष रुपये*

*श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यकरण करणे*

*कामाची किंमत अंदाजे ७५ लक्ष रुपये*

🚩*एकूण पूर्ण कामांची किंमत १ कोटी ८५ लक्ष रुपये*कामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता अग्रवाल यांनी केले तर संचालन अनिल मुरूमकर तर आभार प्रदर्शन निलेश काकड यांनी केले.

*

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.