ताज्या घडामोडी
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, १२८ कोटींची मदत जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Akola B7 News
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, १२८ कोटींची मदत जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने १२८ कोटी ६५ लाखांची मदत जाहीर केली आहे. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली. ऑक्टोबर ते डिसेंबरमधील बाधित १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळेल. जानेवारी ते एप्रिल २०२६ दरम्यानच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, राज्यात गारपिटीने कांदा, मका आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.