ताज्या घडामोडी
ठाण्यात एका बांधकाम साईटवर सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; नराधम आरोपीला अटक
Akola B7 News
ठाण्यात एका बांधकाम साईटवर सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; नराधम आरोपीला अटक
ठाण्यातील एका बांधकाम साईटवर सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली. पीडितेची आई गावी गेल्याने ती काल रात्री घरी एकटीच असताना त्या साईटवर बिहारमधून आलेल्या नवीन कामगाराने तिच्यावर अत्याचार करून पळ काढला. नौपाडा पोलिसांनी तत्परता दाखवत दोन-तीन पथके तैनात केली आणि काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. या अमानुष घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.