ताज्या घडामोडी

मराठी पत्रकार परिषदेचे ४४वे अधिवेशन उदगीर येथे; पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सिद्धार्थ शर्मा१८-१९ एप्रिलला भव्य आयोजन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

AB7

मराठी पत्रकार परिषदेचे ४४वे अधिवेशन उदगीर येथे; पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सिद्धार्थ शर्मा१८-१९ एप्रिलला भव्य आयोजन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

अकोला : महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या ४४ व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन १८ व १९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे करण्यात आले आहे. या भव्य अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी केले आहे. या अधिवेशनास मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे आदींसह अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.पत्रकारितेच्या विविध विषयांवर चर्चाया अधिवेशनात वृत्तपत्रांचे प्रश्न, पत्रकारांच्या समस्या तसेच आधुनिक साधनसामग्रीच्या युगातील गतिमान पत्रकारिता या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.अकोला व विदर्भातील पत्रकारांना विशेष आवाहनअकोला जिल्ह्यासह नागपूर व अमरावती विभागातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी आदी तालुक्यांतील पत्रकारांनी जिल्हा पत्रकार संघाशी संपर्क साधून नियोजन करावे, असे आवाहन अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजूरकर, सहचिटणीस संजय खांडेकर, दीपक देशपांडे, विजय शिंदे, सत्यशील सावरकर, उपाध्यक्ष रामदास वानखडे, दिलीप देशमुख यांनी केले आहे.

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.