स्नेहमेळावा : ऐक्याचा संदेश; समाजभवन उभारणीचा युवकांचा संकल्प भटक्या-विमुक्तांना स्थैर्याची गरज
Akola B7 News
स्नेहमेळावा : ऐक्याचा संदेश; समाजभवन उभारणीचा युवकांचा संकल्प भटक्या-विमुक्तांना स्थैर्याची गरज
पुणे, शहर प्रतिनिधी गोंधळी व भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्थैर्य अत्यावश्यक असल्याचे मत भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव काळे यांनी व्यक्त केले. गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघ व अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेतर्फे आयोजित स्नेहमेळावा व वधू-वर परिचय संमेलनात ते बोलत होते. शुभारंभ लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्नेहमेळाव्यास सुमारे १५०० समाजबांधव, तर वधू-वर परिचयसंमेलनात ३५० युवक-युवती सहभागी झाले.काळे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची गरज अधोरेखित केली. उदय धातुंडे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजपचे प्रदेशप्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी गोंधळी समाज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. तसेच समाजासाठी मोफत नेत्रशस्त्रक्रिया राबविण्याची घोषणा केली. कार्यक्रमात समाजभवन उभारणीचा संकल्प व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन मुकुंद