मोफत लाठी काठी स्वसंरक्षण प्रशिक्षण सबहेड – महाराष्ट्रात सिलंबम असोसिएशन व स्वयंसिद्धा असोसिएशन चे आयोजन
AB7 ज्ञानेश्वर निखाडे
मोफत लाठी काठी स्वसंरक्षण प्रशिक्षण सबहेड – महाराष्ट्रात सिलंबम असोसिएशन व स्वयंसिद्धा असोसिएशन चे आयोजन
अकोला – लाठी काठी स्वसंरक्षण प्रशिक्षण मोफत आयोजन महाराष्ट्रात सिलंबम असोसिएशन व स्वयंसिद्धा असोसिएशन च्या वतीने राज्य प्रमुख डॉ.खुशबु चोपडे यांनी केले आहे.लाठी काठी प्रशिक्षण शारदा समाज मंदिर Twc जिमच्या बाजुला मराठा नगर सध्याकाळी ६:३० ते ७:३० वा दि ५/ ४/२०२६ ते १४/ ४/२०२६ पर्यंत राहणार आहे.प्रशिक्षणासाठी स्वसंरक्षण ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज आजच्या वेगाने बदलणाऱ्या समाजात स्वसंरक्षण ही केवळ एक कला नसून प्रत्येकासाठी आवश्यक जीवनकौशल्य बनले आहे. वाढत्या घटना आणि असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विशेषतः महिला, मुली आणि विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन व स्वयंसिद्धा असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने लाठी-काठी स्वसंरक्षण (सिलंबम) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाद्वारे सहभागींच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्यांना स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.मुख्य मास्टर ट्रेनर सिहान अरुण सारवान, तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणामुळे शारीरिक ताकद, मानसिक धैर्य आणि संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. स्वसंरक्षण शिका – सुरक्षित जीवन जगा! अधिक माहितीसाठी संपर्क डॉ. खुशबू चोपडे (राज्य प्रमुख)मो. 9325564839 / 9359648409 यांचेशी संपर्क करावा.