ताज्या घडामोडी
खाटेवर आईच्या कुशीत झोपलेल्या बालिकेला हिंस्त्र प्राण्याने नेले उचलून, आढळले मांसाचे तुकडे
Akola B7 News
खाटेवर आईच्या कुशीत झोपलेल्या बालिकेला हिंस्त्र प्राण्याने नेले उचलून, आढळले मांसाचे तुकडे
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे शिवारात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात खाटेवर आईच्या कुशीत झोपलेल्या दोन महिन्यांच्या बालिकेला एका हिंस्त्र प्राण्याने (प्राथमिक अंदाजानुसार बिबट्या) उचलून नेले. सकाळी शोध घेतला असता, वास्तव्य असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर बालिकेच्या शरीराचे अवशेष व रक्ताचे डाग आढळले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.