ताज्या घडामोडी
कल्याण येथे कुत्र्यांच्या प्रश्नावरुन वाद गेला विकोपाला, प्राणीमित्र व रहिवाशांवर गुन्हे दाखल
Akola B7 News
कल्याण येथे कुत्र्यांच्या प्रश्नावरुन वाद गेला विकोपाला, प्राणीमित्र व रहिवाशांवर गुन्हे दाखल
कल्याण येथील वाधवा मेडोज सोसायटीत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरुन प्राणीमित्र व रहिवाशांमधील वाद विकोपाला गेला आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दर महिना ₹१६ हजार मागणी केल्याच्या आरोपावरुन २ प्राणीमित्रांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. याला प्रत्युत्तर म्हणून सोसायटीतील एका कुत्र्याला मारल्याचा आरोप करत प्राणीमित्रांनी रहिवाशांविरुद्ध गुन्हा नोंदवला. खडकपाडा पोलीस या प्रकरणांचा तपास करत आहे.