ताज्या घडामोडी
मसाप’च्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप; हायकोर्टात ‘रिट’ दाखल
Akola B7 News
‘मसाप’च्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप; हायकोर्टात ‘रिट’ दाखल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे योगेश सोमण अध्यक्षपदी निवडून आले होते. त्यांना ५ हजार ३६५ मते मिळाली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीत सोमण यांनी मिलिंद जोशींचा ४५ मतांनी पराभव केला होता. दरम्यान, मसापच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतमोजणी करताना गैरप्रकार झाल्याचा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीनं केला असून मुंबई हायकोर्टात रिट अर्ज दाखल केला आहे.