ताज्या घडामोडी

चाळीसगावला आजी-आजोबांनी दिली साक्षरतेची परीक्षा

Akola B7 News

 

चाळीसगावला आजी-आजोबांनी दिली साक्षरतेची परीक्षा

चाळीसगाव : साक्षरतेकडून समृद्धीकडेया संकल्पनेतून केंद्र शासनाच्या ‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत रविवारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी घेण्यात आली. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या परीक्षेला तालुक्यातील सुमारे १८०० असाक्षरांनी प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातही रविवारी शाळा भरल्या असून अनेक ठिकाणी आजी-आजोबा नातवांसोबत परीक्षा देताना दिसले.तालुक्यात एकूण ३६७५ निरक्षरांची नोंद करण्यात आली असून वय वर्षे १५ ते ३५ गटातील व्यक्तींना या कार्यक्रमातून वाचन, लेखन व संख्या ज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे. केंद्रशासन पुरस्कृत हा साक्षरता उपक्रम मागील पाच वर्षांपासून राबविला जात आहे. यासाठी उल्लास अॅपद्वारे नोंदणी करण्यात आली असून स्वयंसेवकांच्या माध्यमातून असाक्षरांना अक्षरओळख व मूलभूत शिक्षण दिले जाते.१५०गुण परीक्षेसाठी निश्चित करण्यात आले होते.रविवारी झालेल्या परीक्षेसाठी एकूण १५० गुण निश्चित करण्यात आले होते. वाचन, लेखन व संख्याज्ञान या प्रत्येक घटकावर ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात आले. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक घटकात किमान ३३ टक्के (१६.५ गुण) मिळवणे आवश्यक होते. दिवसभरात कोणत्याही वेळेत तीन तास परीक्षा घेण्यात आली. दिव्यांग उमेदवारांना ३० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात आला.रविवारी सुट्टी असतानाही शाळा भरल्या होत्या आणि या शाळेत विद्यार्थी नव्हे तर आजी-आजोबा होते.चाळीसगावात रविवारी असाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. जि.प. शाळेच्या आडगाव केंद्रावर पेपर सोडवताना वयोवृद्ध नागरिक. दीडशे गुणांची परीक्षागेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांनी घेतलेल्या सरावामुळे 66 मी साक्षर झालो. ही परीक्षा माझ्यासाठी महत्त्वाची ठरली असून आत्मविश्वास वाढला आहे.हिरामण बाबुराव आवारे, जि.प. शाळा शिंदी, ता. चाळीसगावचाळीसगावात निरक्षरांची संख्या लक्षणीयदरवर्षी मूल्यमापन परीक्षा घेऊन त्यांची प्रगती तपासली जाते. उल्लास अॅपवरील नोंदीनुसार परीक्षा देणाऱ्या असाक्षरांची सर्वाधिक संख्या जामनेर तालुक्यात असून त्यानंतर चाळीसगाव तालुक्याचा क्रमांक लागतो.चाळीसगाव तालुक्यातील १८०० असाक्षरांनी परीक्षेला सामोरे जात चांगला प्रतिसाद दिला. ३६७५ जणांची नोंदणी झाली असून हा उपक्रम पुढेही सुरू राहणार आहे.विलास भोई, गटशिक्षणाधिकारी, चाळीसगावमुळाक्षरे, गणिते व उजळणीचा सराव केल्याने परीक्षा देताना दडपण आले नाही. आता मला लिहिता-वाचता येऊ लागले आहे.

 

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.