ताज्या घडामोडी
राज्यभरातील शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी; १५ जूनला शाळा पुन्हा भरणार
Akola B7 News
राज्यभरातील शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी; १५ जूनला शाळा पुन्हा भरणार
शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून सुट्टी सुरू होईल. १ मे रोजी निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची सुट्टी सुरू होणार असली तरी विदर्भातील शाळांना मोठा बदल स्वीकारावा लागणार आहे. कडक उन्हाळ्यामुळे दरवर्षी विदर्भातील शाळा उशिरा सुरू होत, मात्र यंदा सुट्ट्यांत एकरूपता आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा १५ जूनलाच सुरू होणार आहेत.