गुंठेवारी भुखंडांच्या नियमितीकरणाला हिरवा कंदील!मनपाच्या सर्वसाधारण सभेत एक वर्षाची मुदतवाढ
Akola B7 News
गुंठेवारी भुखंडांच्या नियमितीकरणाला हिरवा कंदील!मनपाच्या सर्वसाधारण सभेत एक वर्षाची मुदतवाढ
अकोला: शहरातील गुंठेवारी भूखंडधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. काही काळ बंद ठेवण्यात आलेली गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, प्रलंबित प्रकरणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.शहरातील मोठा भूभाग गुंठेवारी पद्धतीने विकसित झाल्यामुळे या भूखंडाच्या नियमितीकरणासाठी महापालिकेकडे यापूर्वी २३०४ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी सुमारे १४५०3D.0प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली होती. मात्र, नंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आल्याने अनेक नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहिले होते. अकोला महानगर क्षेत्रातील तब्बल ३८ टक्क्यांहून अधिक भाग गुंठेवारी स्वरूपात असल्याने अनेक वर्षापासून नागरिकांना विडिय अडचणींना सामोरे जावे लागत होते ‘नमुना ड’ अभावी मालमत्ता कार्ड मिळत नसल्याने बैंक कर्जासाठीही अडथळे निर्माण होत होते. सभेत गुंठेवारी प्लॉटचे नियमन व्यावसायिकांनी, गैरफायदा घेऊ नये, यासाठी काही मर्यादाही निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार ३ हजार चौरस फुटांपर्यंतच्या गुंठेवारी प्लॉटचेच नियमन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, ज्या भूखंडांवर आधीच बांधकाम झालेले आहे, त्यांना या मर्यादेतून सूट देण्यात आली आहे. करताना बांधकामकर हा मनपेमाठी प्रमुख दंड माफ करण्यात आल्यान या संधीचा लाभ ऊन तातडीने कर भरावा, असे आवाहनही त्यांनी केलेकाय आहे निर्णय ?गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया पुन्हा सुरू प्रलंबित प्रकरणांना १ वर्षाची मुदतवाढ नागरिकांना होणारा फायदा बांधकाम परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा ‘नमुना ड व मालमत्ता कार्ड मिळणार बैंक कर्ज मिळण्यात सुलभता घराचे स्वप्न साकार होण्याची संधी नियमांतील महत्त्वाच्या अटी ३ हजार चौ. फुटापर्यंतच्या प्लॉटचे नियमन बांधकाम असलेल्या प्लॉटला मर्यादा लागू नाही गैरफायदा टाळण्यासाठी कडक अंमलबजावणी