गॅस एजन्सींच्या मनमानी कारभाराविरोधात निवेदन
शिवर : अकोला जिल्ह्यातील एलपीजी गॅसएजन्सींकडून कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण डी. वाहुरवाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील अनेक गॅस वितरकांकडून “स्टॉक उपलब्ध नाही”, “पुरवठा बंद आहे” अशी कारणे देत ग्राहकांना वारंवार परत पाठवले जात आहे. परिणामी नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. काही ठिकाणी घरपोच गॅस वितरण सेवा बंद करण्यात आल्याने नागरिकांना एजन्सीवर जाऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व कष्टकरी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे.तक्रार करणाऱ्या ग्राहकांशी उर्मट वागणूक देणे, धमकावणे व चुकीची माहिती देणे असे प्रकार वाढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एलपीजी गॅस ही जीवनावश्यक वस्तू असून संबंधित कायद्यांनुसार कृत्रिम | तुटवडा निर्माण करणे, सेवा नाकारणे अथवा अतिरिक्तजिल्हा पुरवठा अधिव अकोलाकृत्रिम तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त चौकशी व कारवाईची मागणीवसुली करणे हे नियमबाह्य असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी एजन्सींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये स्टॉक व वितरण नोंदींची तपासणी, अतिरिक्त वसुली करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, तसेच नागरिकांसाठी तक्रार निवारण यंत्रणा सुरू करणे यांचा समावेश निवेदनात आहे.