ताज्या घडामोडी

सुट्टीवर आलेल्या जवानाची मित्रांकडूनच हत्या; अकोल्यातील जुना शहर परिसरातील घटना

Akola B7

सुट्टीवर आलेल्या जवानाची मित्रांकडूनच हत्या; अकोल्यातील जुना शहर परिसरातील घटना

अकोला : देशाच्या सीमेवरडोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या एका भारतीय लष्करातील जवानाचा त्याच्याच मित्र म्हणवणाऱ्यांनी घात केला आहे. अकोला शहरात जुना शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक घटनेत, सुट्टीवर आलेल्या जवान सुशील तेलगोटे यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात साळबळ उडाली असून लष्करी आणि नागरी वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशील तेलगोटे हे देशसेवेतून काही दिवसांच्या सुट्टीवर आपल्या घरी अकोल्यात आले होते. बुधवार, २५ मार्च रोजी रात्री ते आपल्या काही मित्रांसोबत बाहेर गेले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास झालेल्या एका वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले. जुन्याअंतर्गत वैमनस्यातून किंवा तात्कालिक कारणावरून त्यांच्याच मित्रांनी सुशील यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्लयात सुशील गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, जखमा गंभीर असल्याने त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज शुक्रवारी रात्री अपयशी ठरली. याप्रकरणी मृत जवानाचे वडील दिलीप दयाराम तेलगोटे यांनी जुना शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनीतातडीने तपासचक्रे फिरवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, यात सहभागी असलेल्या तीन मुख्य संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये यशवंत उर्फ गोलू गणेश ठाकूर (वय २७, रा. अकोली), जय विनोद मरिकर (रा. अकोली) आणि बाळा घुमाजी सोलापुरे (रा. अकोली) यांचा समावेश आहे. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हा हल्ला नेमका कोणत्या पूर्ववैमनस्यातून झाला की आणखी काही छुपे कारण होते, याचा शोध जुना शहर पोलीस घेत आहेत. रक्षणकल्यां जवानाची अशा प्रकारे भरवस्तीत आणि ओळखीच्या लोकांकडूनच हत्या झाल्याने अकोली परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.