मिडल बर्थबाबत रेल्वेचे नियम काय आहेत?
भारतीय रेल्वेनुसार, दिवसा मिडल बर्थ दुमडली पाहिजे जेणेकरुन खालच्या बर्थवरील प्रवासी आरामात बसू शकतील. आरक्षित डब्यांमध्ये झोपण्याची वेळ रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत आहे, तर उर्वरित वेळेत बसून राहिले पाहिजे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, जर रुग्ण/गर्भवती महिलांसारख्या गरजू लोकांना या वेळेपेक्षा जास्त झोपायचे असेल, तर प्रवाशांनी त्यांना मदत केली पाहिजे.