ताज्या घडामोडी
पाण्याच्या खुल्या टाकीत भरले २०० लिटर डिझेल, चिखलीत पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल
Akola B7
पाण्याच्या खुल्या टाकीत भरले २०० लिटर डिझेल, चिखलीत पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल
देशातील काही भागात पेट्रोल-डिझेलची कमतरता असल्याचे चित्र समोर आलं असून नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलचा साठा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच बुलडाण्याच्या चिखली येथील पेट्रोल पंपावर पाण्याच्या खुल्या टाकीत २०० लिटर डिझेल विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. चिखली तहसीलदारांच्या तक्रारीवरुन रेणुका पेट्रोलियमच्या मालकावर चिखली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.