ताज्या घडामोडी
मुंबईच्या दादर स्टेशनवर दिसला साप, प्रवाशाने शेपटी पकडली अन् पिशवीत भरला; VIDEO व्हायरल
Akola B7
मुंबईच्या दादर स्टेशनवर दिसला साप, प्रवाशाने शेपटी पकडली अन् पिशवीत भरला; VIDEO व्हायरल
गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी संध्याकाळी अचानक साप निघाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. पश्चिम भागातील उड्डाणपुलाजवळ साप दिसताच एकच गोंधळ निर्माण झाला. काहींनी व्हिडीओ काढण्यासाठी गर्दी केली तर काही भीतीपोटी लांब पळाले, अखेर एका प्रवाशाने प्रसंगावधान राखून सापाची शेपटी पकडून प्लास्टिकच्या पिशवीत जेरबंद केले. या धाडसी कृत्यामुळे प्रवाशांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.