ताज्या घडामोडी
महाराष्ट्राला लागले आषाढीचे वेध, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वेळापत्रक आले समोर
AB7
महाराष्ट्राला लागले आषाढीचे वेध, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वेळापत्रक आले समोर
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यंदा ८ जुलैला आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. विशेष म्हणजे सायंकाळी ४ वाजण्याऐवजी दुपारी ३ वाजता पालखी मार्गस्थ होणार आहे. यावर्षी पालखी सोहळा एकूण १८ दिवसांचा असणार असून त्यामध्ये १७ मुक्कामांचा समावेश आहे. सोहळ्यात ४ गोल व ३ उभे रिंगण पार पडणार असून २५ जुलैला पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा केला जाणार आहे.