ताज्या घडामोडी

शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या अकोला जिल्हा सरचिटणीसपदी प्रविण वाहुरवाघ यांची नियुक्तीविभागीय बैठकीत सर्वानुमते निर्णय; अभिजीत आठवले यांची सोशल मीडिया प्रमुखपदी निवड

AB7

शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या अकोला जिल्हा सरचिटणीसपदी प्रविण वाहुरवाघ यांची नियुक्तीविभागीय बैठकीत सर्वानुमते निर्णय; अभिजीत आठवले यांची सोशल मीडिया प्रमुखपदी निवड

 

अकोला…….∼:स्थानिक अकोला येथील सर्किट हाऊस येथे शिवसेना सामाजिक न्याय विभागाची विभागीय बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे प्रविण वाहुरवाघ यांची शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या अकोला जिल्हा सरचिटणीस पदावर सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे सामाजिक न्याय विभागाच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या बैठकीतच अभिजीत आठवले यांची शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या अकोला जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदावर निवड करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या विभागीय बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग दादा पिंजरकर उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये उपजिल्हाप्रमुख गोपाल मसणे, फिरोज खान पठाण, महेश बगारे, सागर कुठे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना धांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे अकोला जिल्हाध्यक्ष जे. पी. सावंग यांनी केले. त्यांच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे बैठक अत्यंत शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात पार पडली.

बैठकीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी विभागाच्या आगामी कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक प्रभावी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मांडले.

नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस प्रविण वाहुरवाघ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. सामाजिक न्याय विभाग अधिक मजबूत करून गरजू, वंचित, दुर्बल घटकांच्या न्यायहक्कासाठी सतत संघर्षरत राहू.”

तसेच नव नियुक्त सोशल मीडिया प्रमुख अभिजीत आठवले यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून संघटनेचे कार्य, जनतेचे प्रश्न आणि शिवसेनेची भूमिका प्रभावीपणे जनतेसमोर मांडण्याचा संकल्प व्यक्त केला.

या बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या पुढील नियोजनावर चर्चा करण्यात आली. आगामी काळात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन संघटन मजबूत करणे, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून लोकहिताच्या आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या नियुक्त्यांमुळे शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या अकोला जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला नवसंजीवनी मिळणार असून, सामाजिक न्यायासाठीचे कार्य अधिक व्यापक प्रमाणात राबवले जाईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.