ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात वीज स्वस्त, १० ते १४ टक्क्यांनी कपात; राज्य सरकारचा निर्णय
महाराष्ट्रात वीज स्वस्त, १० ते १४ टक्क्यांनी कपात; राज्य सरकारचा निर्णय
राज्य सरकारने १ एप्रिलपासून वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्यांच्या नवीन वीजदर लागू करण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार १० ते १४ टक्क्यांनी वीज दर कमी होणार असून घरगुती वापराच्या सर्व टप्प्यांमध्ये कपात केल्याने ऐन उन्हाळ्यात ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे.