ग्राहक दिनानिमित्त शाहीर खंडुजी सिरसाट यांनी केले पोवाड्यातून केले प्रबोधन
अकोला:-जिल्हाधिकारी कार्यालय येथील काटेपूर्णा सभागृह येथे ग्राहक दिनानिमित्त शाहीर खंडुजी सिरसाट यांनी पोवाड्यातुन (जनजागृती) प्रबोधन केले. सदर कार्यक्रमाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीपाद कुळकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र येन्नेवार, सहाय्यक जि. अधिकारी अर्चना निमजे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी ग्राहकांचे संरक्षण अबाधित राखण्याकरिता विस्तृत माहिती बोलताना दिली आहे. तसेच जनजागृती लोकनाट्य मंडळाचे कलावंत खंडूजी सिरसाट शाहीर, विश्वास शिरसाट, विलास परघरमोल, राहुल बंधु
गोपनारायण, भीमराव तायडे, विठ्ठल खंडारे, प्रदीप राऊत यांनी यावेळी पोवाडात सहकार्य लाभले.