ताज्या घडामोडी
पेट्रोलचा मुबलक साठा, सोशल मीडियात अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणारः मंत्री महाजन
B7 News
पेट्रोलचा मुबलक साठा, सोशल मीडियात अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणारः मंत्री महाजन
राज्यात पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा लागल्या असून वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी गर्दी झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे, अनेक ठिकाणी पेट्रोल पंपचालकांनी जास्तीत जास्त २०० किंवा ३०० रुपयांचेच पेट्रोल देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पेटोल-डिझेलसंदर्भात अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय. यावेळी महाजनांनी विविध विषयांवर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली.