.
निहितार्थ कार्य करणारे
जन अभियान फाउंडेशन व आरोग्य सेवा फाउंडेशनस्वास्थ्य सेवा कार्ड समाजपयोगी कार्यात आपले सहर्ष स्वागत आहे
अकोला:-व्यक्ती आजारी पडल्यानंतर झटपट रुग्णालयात न जाता आजार अंगावर काढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आजार वाढतो आजाराचे निदान होण्यास वेळ लागतो त्यामुळे उपचारास होणारा खर्च वाढतो. स्वास्थ्य सेवा कार्ड योजने अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन आरोग्याविषयी जनजागृती करणे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत अशा ठिकाणी आरोग्य शिबिर घेणे व आरोग्य ही संपत्ती आहे, (Health is Wealth) एक वेळ पैसा संपला तर तो कमवता येईल पण आरोग्य संपलं तर कमवता येत नाही याचे महत्त्व पटवून देण्याचे काम संपूर्ण अकोला जिल्ह्यात जन अभियान फाउंडेशन व आरोग्य सेवा फाउंडेशन चे प्रतिनिधी, संस्थेचे आरोग्य दूत करत असतात. गावोगावी वाऱ्या वस्त्यावर ही योजना राबवत असताना योजनेच्या माध्यमातून स्वास्थ्य सेवा कार्ड दिले जाते. स्वास्थ्य सेवा कार्ड धारकांना जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणचे खाजगी डॉक्टर, लॅब व मेडिकल चालक ही बिलामध्ये सवलत देऊन सामाजिक कार्य करत आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवून डॉक्टर, लॅब व मेडिकल चालक पण समाजाला आपण काहीतरी देणं लागत या भावनेतून आम्हाला सहकार्य करीत आहेत.
तपासणी व उपचार हा पूर्ण डॉक्टर वर अवलंबून असेल. आमच्या संस्था रुग्णांना आर्थिक झळ कमी बसेल व त्याची शासकीय योजनेत फाईल त्त्यांच्या कागदपत्रच्या आधारावर बनवून देईल. कोणत्या डॉक्टर कडे उपचार करायचा हे ठरवण्याचा अधिकार पूर्णतः रुग्णांचा व रुग्णांनाच्या नातेवाईकाचा असेल. उपचार दरम्यान तब्बेतीत होणाऱ्या कमी जास्त बिघाडास संस्था जबाबदार राहणार नाही.
संस्थेचा मुळ उद्देश तुम्हाला सवलत मिळावी व तुम्ही वैद्यकीय शासकीय योजनेस पात्र असल्याच त्याबाबत सर्व माहिती करून देऊन रीतसर लागणारे कागदपत्र एकत्रित करून देण्यास मदत करेल.
करिता आजच आपलं स्वास्थ्य सेवा कार्ड दैनिक जनयात्रा, शॉप न. 7, दुसरा माळा, Gmd मार्केट ते रणपिसे नगर चौक रोड, सिग्मा कॉम्प्युटर वर, सिव्हिल लाईन ते जवाहर नगर रोड, रणपिसे नगर चौक, अकोला महाराष्ट्र 444001 या पत्यावर जाऊन घ्यावे.
संपर्क नं. 9226220561 जागरूकता, निरोगी राहण्याची गुरुकिल्ली.आयोजक : सौ. पूजा काळे (संचालिका) जन अभियान फाउंडेशन अकोला