ताज्या घडामोडी

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेटिना

Akola B7 News

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेटिना

 

नवी दिल्ली (वृ.सं.)पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतात एलपीजीचा तुटवडा गंभीर झाला होता. अशा कठीण काळात तब्बल 20 हजार किमी दूर असलेला दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना भारताच्या मदतीसाठी धावून आला आहे. या संकटात अर्जेंटिनाने भारताला एलपीजी पुरवण्याची तयारी दर्शवली आहे.भारतामधील अर्जेंटिनाचे राजदूत मारियानी अगस्टिन कौसेनो यांनी सांगितले की, भारताच्या ऊर्जा सुरक्षेत मोठी भूमिका बजावण्यासाठी त्यांचा देश पूर्णपणे तयार आहे, त्यांनी भारताच्या ‘ऊर्जा विविधीकरण’ धोरणाचे कौतुक करत अर्जेटिनाकडे नैसर्गिक वायूचे मोठे साठे उपलब्ध असल्याचे नमूद केले. अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय गॅस आणि तेल कंपनीचे प्रमुख मागील वर्षी दोनदा भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी तसेच भारतीय ऊर्जा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बैठक20 हजार किमी दूरून अर्जेंटिना भारताला एलपीजी पुरवणारघेतली होती.अजेंटिनाने 2026 च्या पहिल्या तिमाहीत भारताला 50,000 टन एलपीजीचा पुरवठा केला, जो संपूर्ण 2025 वर्षात पाठवलेल्या 22 हजार टनांच्या दुप्पटाहून अधिक आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वीच बहिया ब्लांका बंदरातून 39 हजार टन एलपीजीभारतात पोहोचले होते. संकटाच्या काळात 5 मार्च रोजी आणखी 11 हजार टनांचा एक शिपमेंट पाठवण्यात आला.भारताच्या सुमारे 60 टक्के एलपीजी आयात होर्मुज सामुद्रधुनीमार्गे होते. युद्धामुळे हा मार्ग प्रभावित झाल्याने पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला.या संकटावर मात करण्यासाठी भारत सरकारने देशांतर्गत स्तरावरही उपाययोजना केल्या. हॉटेल आणि खाद्यव्यवसायांसाठी कमर्शियल एलपीजी कोटा 20 टक्के ने वाढवण्यात आला. तसेच पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) कनेक्शन जलद गतीने देण्यास सुरुवात करण्यात आली.ऊर्जा सुरक्षिततीसाठी भारत सरकारने जगातील 40 हुन अधिक देशांशी संपर्क वाढवला आहे. अर्जेंटिनासोबतची ही भागीदारी तुलनेने नवी आहे. 2024 पूर्वी अर्जेटिना भारताला एलपीजी पुरवत नव्हता; मात्र युद्धामुळे हे संबंध वेगाने मजबूत होत आहेत. जरी 20,000 किमी दूरून माल आणाताना वेळ आणि खर्च जास्त लागतो तसेच हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता असते, तरीही हा पुरवठा भारतासाठी मोठा दिलासा ठरत आहे.दरम्यान, इराणने अलीकडेच भारतासह काही मैत्रीपूर्ण देशांच्या जहाजांसाठी होमुंज सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा केली असून त्यामुळे पुढील काळात पुरवठा सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करून होर्मुज मार्ग सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले होते. भारत सरकार ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने सर्व आवश्यक पावले उचलत आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.