ताज्या घडामोडी

गावाच्या टोकापर्यंत पाणी मग गुडधीलाच का नाही?तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प; म्हणे ४६ लाखांची जलवाहिनी टाकणार

Akola B7

गावाच्या टोकापर्यंत पाणी मग गुडधीलाच का नाही?तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प; म्हणे ४६ लाखांची जलवाहिनी टाकणार

 

अकोला : गुडधी उपनगरातलगतच्याटोकापर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे, परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या गुडधीलाच पाणीपुरवठा का नाही?, असा प्रश्न आता येथील नागरिक विचारू लागले असून, आमचा अंत बघू नका, असा इशाराही महापालिका प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याशी संपर्क साधला असता, नवीन जलवाहिनी टाकायची आहे. त्यासाठी ४६ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.येथील महिला गेल्या तीन महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हाळ्यात पिण्याच्यापाण्यासाठी महिलांसह नागरिकांना दररोज पायपीट करावी लागत असून, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. गुडधी परिसरातील अनेक घरांना नळाद्वारे पाणी मिळत नसल्याने नागरिकांचा आधार हापसाच्या पाण्यावर आहे. मात्र, या स्रोतांमध्येही पाणी अत्यल्प असून, उपलब्ध पाणी प्रचंड खारट असल्याने ते पिण्यास, तसेच घरगुती वापरासाठीही योग्य नाही. कपडे धुणे किंवा भांडी स्वच्छ करणेही या पाण्यामुळे कठीण झाले आहे.परिसरातील महिलांना दररोज लांब अंतरावरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अनेक कुटुंबांना टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली असून, त्यामुळे त्यांचा अतिरिक्त आर्थिक खर्च वाढला आहे.टँकरद्वारे पाणी द्या!आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मात्र उपलब्ध खारट पाण्यावरच तहान भागवावी लागत असल्याची परिस्थिती आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याची समस्या अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी तातडीने नियमित नळ पाणीपुरवठा सुरू करावा किंवा टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.