ताज्या घडामोडी
मंत्रिमंडळातून तीन जणांची विकेट जाणार; अशोक खरात प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Akola B7
मंत्रिमंडळातून तीन जणांची विकेट जाणार; अशोक खरात प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
काँग्रेसचे नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, ‘पेन ड्राइव्ह समोर आणा, सगळे नागडे होतील, मंत्रिमंडळातील दोन-तीन जणांची विकेट जाईल, एवढं मी जबाबदारीने सांगतो. कोणी-कोणी खरातची पायापासून डोक्यापर्यत सेवा केली, हे समोर येईल. ‘आता या सगळ्यांना वाचविण्यासाठी खरातचा एनकाउंटर होऊ शकतो, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.