ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात जुन्या वादातून तरुणाची तलवारीने वार करून निघृण हत्या
Akola B7
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात जुन्या वादातून तरुणाची तलवारीने वार करून निघृण हत्या
नाशिक जिल्ह्यातील मालेगावात सलीम शेख या तरुणाची ५ ते ७ जणांच्या टोळक्याने पाठलाग करून निघृण हत्या केली. अख्तराबाद भागातील बीडी गोडाऊनजवळ जुन्या भांडणाच्या कुरापतीतून संशयितांनी लाठ्या, कोयते आणि तलवारीने सलीमच्या डोक्यावर व हातापायावर गंभीर वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मतीन मुल्ला, कलिम नाट्यासह सात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.