तोतया ज्योतिषाकडून महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ३३ लाखांची लूट
मुंबईच्या मालाडमध्ये अमर महागावकर नावाच्या तोतया ज्योतिषाने महिलेचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुकवर ओळख वाढवून आरोपीने मार्वे बीच येथील हॉटेलमध्ये पीडितेवर अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केले. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची व आत्महत्येची धमकी देत त्याने महिलेकडून ₹३३ लाख उकळले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.