व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, पुण्यातील आरोपीला अटक
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ४२ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार करणाऱ्या ५० वर्षीय विजय लक्ष्मण गावडेला निगडी पोलिसांनी अटक केली. आरोपीने महिलेला लग्नापूर्वी तिच्यासोबतच्या खासगी क्षणांच्या व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ पतीला पाठवून बदनामी करेन अशी धमकी देत त्याने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. अखेर महिलेने १५ मार्चला निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.