ताज्या घडामोडी
पुण्यात पत्नीने नांदायला येण्यास दिला नकार; संतापलेल्या पतीने तिची दुचाकी दिली पेटवून
Akola B7
पुण्यात पत्नीने नांदायला येण्यास दिला नकार; संतापलेल्या पतीने तिची दुचाकी दिली पेटवून
पुण्याच्या वारजे परिसरात पती-पत्नीतील वादातून पतीने पत्नीची दुचाकी पेटवून दिली. दीड वर्षांपासून वेगळे राहत असलेल्या पत्नीने सासरी परतण्यास नकार दिल्याने पतीने रागाच्या भरात तिच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये जाऊन हे कृत्य केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी पतीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.