कोलंबियाच्या लष्करी विमान अपघातात ६६ जणांचा मृत्यू
सोमवारी १२५ जणांना घेऊन जाणारे कोलंबियाच्या हवाई दलाचे विमान (हर्म्युलस सी-१३०) कोसळले असून, त्यात ६६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी सांगितले की, पेरूच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण अॅमेझॉन प्रदेशातील प्युएर्तो लेगुइझामो येथून उड्डाण करताना हे विमान कोसळले.