ताज्या घडामोडी
दादर-रत्नागिरी ट्रेन १५ दिवसांत सुरु करा अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखूः मनसे
Akola B7
दादर-रत्नागिरी ट्रेन १५ दिवसांत सुरु करा अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखूः मनसे
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर पुन्हा दादरपर्यंत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. गेल्या काही वर्षांपासून ही गाडी दिव्यापर्यंतच मर्यादित केल्याने कोकणवासीयांची गैरसोय होत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला. १५-२० दिवसांत मागणी मान्य न झाल्यास युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखण्याचा इशारा त्यांनी दिला. मनसेच्या नितीन सरदेसाईंनीही रेल्वे प्रशासनावर टीका करत आंदोलनाचा इशारा दिला.