ताज्या घडामोडी

वाईच्या मातीत घुमला गोंधळी कुलवाद्याचा आवाज तर प्रथम क्रमांक मिळवला महाकाली गोंधळी  संच चंद्रपूर यांनी 

सतीश पवार

. वाईच्या मातीत घुमला गोंधळी कुलवाद्याचा आवाज तर प्रथम क्रमांक मिळवला महाकाली गोंधळी  संच चंद्रपूर यांनी

P

जय भवानी गोंधळी मंडळ वाई (रोहना) ता. आर्वी जि. वर्धा विदर्भ द्वारा आयोजित राज्यस्तरीय भव्य गोंधळी स्पर्धा यामध्ये 21 मार्च रोजी घेण्यात आला होता या स्पर्धेत प्रथम क्रमांक महाकाली गोंधळी संच चंद्रपूर यांनी मिळवला तर दुसरा क्रमांक  मेहकर येथील नामवंत गोंधळी कलावंत दुर्गादास काटे महाराज यांच्या आई रेणुका गोंधळी संचाला द्वितीय पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व व रोख 30001 देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आमदार श्री सुमित भाऊ वानखेडे आर्वी विधानसभा यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. श्री सुरेश भाऊ वाघमारे माजी खासदार वर्धा लोकसभा यांची उपस्थिती होती उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर सौ. अनिता .भा आहीरकर सरपंच ग्रा.प. वाई श्री राजाभाऊ पावडे जिल्हा चिटणीस भाजपा वर्धा जिल्हा श्री रामकृष्णजी डोईजड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वासुदेव गोंधळी समाज , श्री सूर्यकांत जी डोईजड मराठवाडा विभागीय अध्यक्ष वासुदेव गोंधळी समाज नांदेड श्री यशवंतराव सोळसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव अध्यक्ष श्रीकृष्णाजी डोईजड उपाध्यक्ष किसनराव मारोतराव रेणके सचिव श्री गणेश भाऊ पुंडलिकराव गचकेश्वर कोषाध्यक्ष प्रल्हादराव पालेकर सह कोषाध्यक्ष दशरथराव रेणके सहसचिव तेजस धुमाळे यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध कलावंतांनी सहभाग नोंदवला व मेहकर येथील दुर्गादास काटे महाराजांच्या नेतृत्वाखाली आई रेणुका संचाच्या माध्यमातून गणेश सुपलकर,शिवाजी काटे, मदन काटे , दत्ता कैलकर यांचा सहभाग असलेल्या आई रेणुका संचाला द्वितीय पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला . या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.