अकोला येथील श्री राज राजेश्वर मंदिराच्या 50 कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाने मान्यता देऊन कीमान ५.०० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहामध्ये 293 या प्रस्तावावर चर्चा
Akola B7
अकोला येथील श्री राज राजेश्वर मंदिराच्या 50 कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाने मान्यता देऊन कीमान ५.०० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहामध्ये 293 या प्रस्तावावर चर्चा करताना शासनाला केली…
अकोलादक्षिण भारतातील सर्वात मोठी कावड यात्रा व अकोल्याचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिराच्या 50 कोटीच्या आराखड्याला मंजुरी द्या तसेच शासनाने महाराष्ट्रातील पाचही ज्योतिलिंग साठी विशेष निधी दिला त्याबद्दल अभिनंदन करून विदर्भ मराठवाड्यातील सुप्रसिद्ध मंदिरांना सुद्धा निधी देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाची विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी करून अकोले करांची भावना व पश्चिम विदर्भातील महत्त्वाच्या ग्रामदैवत राजेश्वर चा विषय सभागृहामध्ये मांडला.
आज सभागृहामध्ये सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या 293 सर्व प्रस्तावावर एकत्रित चर्चा करण्यात आली सदर चर्चा करतांना आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला येथील राज राजेश्वर मंदिराला माहिती शासनाने ब वर्ग दर्जा प्रदान केला याकरिता शासनाचे अभिनंदन केले. परंतु सोबतच शासनाने श्री राज राजेश्वर मंदिराच्या विकासासाठी उच्चाधिकार समीतीकडुन मंजूरी देऊन ५.०० कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी शासनाला विनंती केली.
, राज्यातील गड किल्ले संवर्धनाकरिता श्री राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा शासनाकडून प्राप्त करून घतल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले परंतु आमदार सावरकरांनी शासनास सुचना केली की, सोबतच राज्यातील सुमारे 300 किल्ले असुन यांचे संवर्धन व्हावे याकरिता शासनाने डीपीडीसी मार्फत निधी उपलब्ध करून द्यावा अकोला शहरातील असदगड, बाळापुर तसेच अकोट तालुक्यातील किल्ल्यासाठी डीपीडीसी मधून अकोल्याचे मा. पालकमंत्री निधी मंजूर केला आहे परंतु सदरचे किल्ले हे जागतिक वारसा यामध्ये मोडत असल्याने अशा दुरुस्तीसाठी तातडीने मान्यता मिळत नाही करीत शासनाने प्रयत्न करावा , राज्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत काही आजार शासनाने शासकीय हॉस्पिटल करिता राखीव ठेवलेले आहेत अशा आजारांपैकी हिपजाईंट रिप्लेसमेंट , हर्निया, अपेंडिक्स या आजारांवर महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेला संलग्नित खाजगी रुग्णालयामार्फत उपचार करण्याकरिता शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी 293 च्या प्रस्ताव चर्चे दरम्यान केले.
विशेष म्हणजे आमदार रणधीर सावरकर यांनी राज राजेश्वर याला क वर्गाचा दर्जा मिळून गेल्यानकरून,ब, वर्गासाठी राज्य शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये प्रयत्न करून मान्यता मिळून दिली होती आणि आता निधीसाठी सुद्धा विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामदेवता राज राजेश्वर परिसराचा विकास व्हावा या दृष्टीने सातत्याने आमदार सावरकर प्रयत्नशील असून असदगड किल्ल्याचा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित करून अकोले करांच्या भावना सभागृहांमध्ये व्यक्त केल्या