ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत जुगार अड्ड्यावर धाड; १७ आरोपी ताब्यात४.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Akola B7
ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत जुगार अड्ड्यावर धाड; १७ आरोपी ताब्यात४.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
अकोला : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत १७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री. अचिंत चांडक यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. दि. २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:१० वाजता लोहारा शेतशिवार, ता. बाळापूर येथे जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत निखिल अग्रवाल, सागर नांदोकर, गणेश ताथोड, अजय चंडाळणे, आशिष ठाकरे, अमीन देशमुख, अक्षय मोहोळ, आसिफ देशमुख, संतोष गिरी, धरम सारवाण, अंकुश मेटांगे, सचिन कोकाटे, सतीश झगडे, सागर खांदोडे, मंगेश हिंगणे, ज्ञानेश्वर गारमोडे व गजानन देशमुख यांच्यासह एकूण १७ आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जप्त मुद्देमालात ५२ पत्त्यांचे संच, ९६ हजार रुपये रोख रक्कम, ७ मोबाईल फोन (सुमारे ७० हजार रुपये किंमत) तसेच ३ मोटरसायकली (२ लाख ७० हजार रुपये किंमत) यांचा समावेश असून एकूण ४.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली API विजय चव्हाण, हेड कॉन्स्टेबल महेंद्र मलिया, उमेश पराये, भास्कर धोत्रे, कुशाल नेमाडे, रवी खंडारे, तसेच पोलीस कर्मचारी राज चंदेल, करण मानकर, अभिषेक पाठक, श्रीकांत पातोंड, चालक GPSI ठाकरे व पीसी खरात यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
पोलीसांच्या या कारवाईमुळे अवैध धंद्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस स्टेशन डाबकी रोड येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीतांना प्रोत्साहन देणा-या इंस्टाग्राम वरून व्हायरल पोस्ट करणारे आरोपीवर तात्काळ कारवाई…
अकोला : हकीकत अशा प्रकारे आहे की यातील नमुद आरोपी क १ यश गोविंद शर्मा व २ निरंज मंगलसिंग ठाकुर यांनी पोस्टे दाखल अप.क. २३४/२६ कलम १०३ (१), ११५ (२), ३ (५) भान्यासं मधील मुख्य आरोपी अर्जुन नरेन्द्र धनावत रा आश्रय नगर अकोला याने केलेल्या गुन्हयात त्याला बढावा देण्याचे व विजातीय धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे उददेशाने अर्जुन धनावत चा फोटे अपलोड करून त्यावर दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे उददेशाने इन्स्टाग्राम वर पोस्ट केल्याने मृतक च्या नातेवाईकाच्या व विजातीय धर्मीयाच्या भावाना दुखावल्या. तसेच यातील आरोपी क ३. सज्जाद खान याने यातील आरोपी क १ व २ ने केलेल्या पोस्ट वर उददेशुन दोन समाजामध्ये भडकावण्याचे उददेशाने प्रतिकात्मीक इन्स्टाग्राम वर पोस्ट व्हायरल केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होवु नये याकरीता तिन्ही आरोपीतांविरूध्द डाबकी रोड पोलीस स्टेशन तर्फे सरकार तर्फे दिलेल्या फिर्याद वरून अप.क. २३५/२०२६ कलम १९६, (१), (ब), २९९,३ (५) बिएनएस सहकलम ७६ आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर गुन्हयाची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षकां चे आदेशाने स्थापन सोशल मीडिया monitoring सेल चे निदर्शनास सदर बाब आल्याने त्याची माहिती तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन ला देण्यात आली. त्यावर डाबकी रोड पोलिसानी वरील प्रमाणे दखल घेवून कार्यवाही करण्यात आली. प्रमाणे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कडून दखल घेऊन तांत्रीक माहितीच्या आधारे गुन्हयातील आरोपी १) यश गोविंद शर्मा वय २३ वर्ष रा. साईनगर डाबकीरोड अकोला २) निरंज मंगलसिंग ठाकुर वय १९ वर्ष रा. शिव नगर पाण्याचे टाकीजवळ डाबकी रोड अकोला, यांचे वर कायदेशीर कारवाई केली. आरोपी क. ३ याचा शोध सुरू आहे. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अचिंत चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री बी. चंद्रकांत रेडडी साहेब, मा. उपविभागीय अधिकारी श्री सुदर्शन पाटील साहेब यांचे मार्गदर्शनामध्ये पोनि दिपक कोळी, पो.स्टे. डाबकी रोड, अकोला, सपोनि अभिषेक अंधारे, पोउपनि अनिल चव्हाण, सपोउपनि दिपक तायडे, पोहवा उमेश पाटील, प्रेम कश्यप, मंगेश इंगळे, उमेश सुगंधी, प्रविण इंगळे, नापोकॉ राजेश ठाकुर, मंगेश गिते, रामेश्वर मानकर पो.स्टे. डाबकी रोड, अकोला यांनी केली आहे.