पुण्यात वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून आठवीतील मुलीची आत्महत्या
पुण्यातील चिखलीत वडिलांनी मोबाईल तपासल्याच्या रागातून १३ वर्षीय मुलीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. १७ मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर तीन दिवस तिची मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत मुलगी महापालिकेच्या शाळेत आठवीत शिकत होती. या हृदयद्रावक घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.