ताज्या घडामोडी

प्रवीण भोटकर यांना राज्य शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर.

Akola B7 ज्ञानेश्वर निखाडे

प्रवीण भोटकर यांना राज्य शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर..

अकोला:- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय,मौलिक कार्य करणाऱ्या आणि समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार अनेक वर्षापासून दिल्या जातात,सन 2021 ते 2025 या वर्षातील व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय व मौलिक कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार नुकतेच एका शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आले आहेत.सन 2023-24 चा सामाजिक कार्यकर्ता गटातील राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवा पुरस्कार अकोला जिल्ह्यातील पारस येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भोटकर यांना जाहीर करण्यात आला आहे.प्रवीण भोटकर हे उच्च शिक्षित असून सामाजिक कार्यात त्यांच्या कार्याचा दबदबा आहे.महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर रुग्णसेवकांचे जाळे विणले असून रुग्णसेवेसोबतच त्यांनी संस्थापक अध्यक्ष असलेल्या संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था पारस द्वारा संचालित महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबवून युवकांना व्यसनमुक्तीसाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.त्यांच्या या मौलिक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने नुकताच शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनेत्रा पवार,राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ तसेच प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या विशेष उपस्थितीत दिनांक 25 व 26 मार्च रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नरिमन पॉईंट मुंबई येथे हा भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.