ताज्या घडामोडी

राम प्रगट उत्सव निमित्त वाहतूक 26 मार्च गुरुवार रोजी व्यवस्था वेगळी करावी जुना कापड बाजार ते गांधी चौक गांधी चौक ते सिटी कोतवाली तसेच तहसील कार्यालयाचे गणेश घाट पर्यंत दुचाकी वाहनांना सकाळी बारा ते रात्री बारा वाजता पर्यंत बंदी घालण्यात यावी कारण शोभायात्रा तसेच राम मंदिरात येणाऱ्या भावी भक्तांना त्रास होणार नाही या दृष्टीने महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी माजी नगरसेवक भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी केली आहे. 

Akola B7

[20/03, 18:02] GIRISH JOSHI: अकोला

मतदाराविषयी तळमळ त्यांच्या समस्यांची जाण असणारे व मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात हवामानामध्ये बदल लक्षात घेता ग्रामीण भागाची पाण्याची समस्या व येणारी अडचण दूर करण्याच्या दृष्टीने योग्य तो नियोजन होऊन अमृत जल प्रत्येकाच्या घरी पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाला पूर्णत्वात नेण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाई संदर्भात जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांची अडचणी समस्या व ग्रामस्थांची मागणी लोकप्रतिनिधीची मागणी यामधील शासनकडे करण्यात येणारा पाठपुरावा प्रस्ताव या बैठक घेऊन आपल्या सक्रियतेचा परिचय दिला.

 

 

आगामी उन्हाळा आणि सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील पाणी पुरवठा सुरुळीत करण्याकरिता काटेकोर नियोजन करा असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.

 

आगामी उन्हाळा तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची कामे लक्षात घेता तसेच संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन करून पाणी पुरवठा सुरुळीत करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत मजीप्रा चे अधीक्षक अभियंता यांचे कक्षात बैठक घेऊन पाणी पुरवठा च्या समस्या व उपाय योजनांचा आढावा घेतला. ६० खेडी खाम्बोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नव्याने पुन:स्थापित करण्यात येत असून या योजनेवर 67.९३ कोटी रुपये खर्च करण्यात येत असून योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. त्या योजनेमध्ये पाणी पुरावठा संबंधाने असलेल्या अडचणी लक्षात घेऊन या योजनेचा गावनिहाय आढावा आमदार रणधीर सावरकर यांनी घेतला. या योजनेंतर्गत असलेल्या घुसर येथील ग्रामस्थांनी सदर केलेल्या पाणी पुरवठा योजना संबंधाने चर्चा करण्यात येऊन घुसर सह लगतच्या परिसरातील गावांना पाणी पुरवठा करण्याकरिता अतिरिक्त संप चे बांधकाम , उंच टाक्यांमध्ये पाणी पोहोचविण्याकरिता अतिरिक्त विद्युत पंप आदीचे बांधकाम करण्याच्या सूचना करून या बाबत अंदाज पत्रकात तरतूद करण्यात आली असून सदरच्या वाढीव तरतुदी प्रमाणे योजनेच्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावाला मान्यता देण्या करिता मुंबई येथील सदस्य सचिव जीवन प्राधिकरण कार्यालयातील अधीक्षक अभियंता अजयसिंह यांचे सोबत भ्रमणध्वनीवर तात्काळ आमदार रणधीर सावरकर यांनी योजनेतील अडीअडचणी संबंधाने सविस्तर चर्चा केली.

तसेच या योजनेच्या ८९.६६ कोटी रुपये किमतीच्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावावर मंजूर देण्या संबंधाने मुंबई येथे दिनांक २३ मार्च २०२६ रोजी बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या.

सदर बैठकीत अकोला येथीस मजीप्राचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता संबंधित उप अभियंता यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी तंचैचा आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांचे मार्फत आयुक्त अमरावती यांना तातडीने सदर करण्यात यावा अशा सूचना बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. सदर बैठकीला राजेश बेले, भरत काळमेघ, विवेक भरणे, निखील काळमेघ, तसेच राठोड कार्यकारी अभियंता मजीप्रा, अतुल साळुंके, कार्यकारी अभियंता जिल्हापरिषद पाणी पुरवठा, कांचन उमाळे उप अभियंता, चौधरी उप अभियंता, मेहरे कनिष्ठ अभियंता, शेगोकार शाखा अभियंता, अभियंता अजय मालोकार, कंत्राटदार तसेच पीएमसी चे प्रतिनिधी उपस्थित होते.

आमदार रणधीर सावरकर ग्रामीण आणि शहरी भागाच्या समस्यांसाठी सातत्याने सक्रिय राहतात आणि सर्वसामान्यांच्या संवेदना वेदना त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव राज्य शासन पाठपुरावा करण्यासाठी सदैव तत्पर राहणारा नेतृत्व असून उन्हाळ्यात त्रास होणार नाही या दृष्टीने त्यांनी नियोजन करू ग्रामीण भागातील पाणी समस्या विशेषता ,खारपान पट्ट्यातील समस्या महत्त्वाची असून त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरू केली आहे आणि उन्हाळ्यात ग्रामीण नागरिकांना वणवण फिरावं लागणार नाही या दृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिला

[23/03, 16:26] GIRISH JOSHI: अकोला

राम प्रगट उत्सव निमित्त वाहतूक 26 मार्च गुरुवार रोजी व्यवस्था वेगळी करावी जुना कापड बाजार ते गांधी चौक गांधी चौक ते सिटी कोतवाली तसेच तहसील कार्यालयाचे गणेश घाट पर्यंत दुचाकी वाहनांना सकाळी बारा ते रात्री बारा वाजता पर्यंत बंदी घालण्यात यावी कारण शोभायात्रा तसेच राम मंदिरात येणाऱ्या भावी भक्तांना त्रास होणार नाही या दृष्टीने महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी माजी नगरसेवक भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी केली आहे.

तसेच दुचाकी वाहनासाठी गणेश घाट तसेच नगरपालिका शाळा क्रमांक एक आणि दोन इथे वाहनाची दुचाकी वाहनाची थांबण्याची व्यवस्था करण्यात यावी या दृष्टीने नियोजन महानगरपालिकेने करावे कारण मोठ्या संख्येत श्री प्रभू रामचंद्राचा प्रगट उत्सव दुपारी बारा वाजता होत असतो गांधी चौक छोटी राम मंदिर मोठे राम मंदिर या परिसरात मोठ्या प्रमाणात सकाळी 11 ते एक वाजता पर्यंत गर्दी असते. तसेच संध्याकाळी पाच ते रात्री बारा वाजता पर्यंत शोभायात्रा तसेच भक्तांची गर्दी लक्षात घेता वाहन व्यवस्था अशोक वाटिकेपासून जुन्या शहराकडे जाणाऱ्या वाहनांना राजेश्वर सेतू या मार्गाने करण्यात यावी तसेच सिटी कोतवाली इथे एकेरी रस्ता असल्यामुळे वाहतुकीला त्रास होईल त्यामुळे दरवर्षी सिटी कोतवाली मागील रोड गाड्या उभा राहत होता त्याचे दुचाकी वाहन शेती कोतवाली किंवा शाळा क्रमांक एक हिंदी शाळा तिथे उभे करण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने दाखल घ्यावी अकोला शहरांमध्ये 27 मंदिर असून या मंदिरात सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार असून या भागात सुद्धा व्यवस्थेच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावी त्यामध्ये प्रसिद्ध मंदिर आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने भावी भक्तांची व्यवस्था दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या दृष्टीने दखल घेण्यात यावी अशी मागणी केली

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.