दारुड्या पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यूः वडाळा परिसरातील घटना
वडाळ्यामध्ये दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या दाम्पत्याचा संसार पतीच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झाला. पती महेश वाड याला दारू सोडण्यास सांगितल्याच्या वादातून त्याने पत्नी कविताला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी कविताचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महेश वाड विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.