मोठ्या राम मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त विविध उपक्रम
अकोला: संत गजानन महाराजांच्यापदस्पर्शाने पावन आणि स्व. बच्चुलाल अग्रवाल यांच्या प्रेरणेने स्थापित मोठ्या राम मंदिरात प्रल्हाद महाराज महिला भजनी मंडळ तसेच श्री जानकी वल्लभो धर्मार्थ संस्था श्रीराम हरिहर संस्था व रामनगर मित्र मंडळच्या वतीने १ लाख श्रीराम जय राम जय जय राम तसेच गण गणात बोते २१०००, मा दुर्गा नामजप २१०००, राम रक्षा मारुती स्तोत्र सह अकोलेकरांच्या कल्याणासाठी नामजप करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सनातन धर्माची प्रगती व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे. २१ मार्चला सूर्य, राहू, शनि, मंगळ, गुरु, शुक्र, बुध, ग्रहांना यांना प्रसन्न करण्यासाठी मानव कल्याणा सोबत स्वकल्याण तसेच परिसराचा विकास तसेच प्रभू श्रीरामाचा आदर्श ठेवून जीवनातही सकारात्मक ऊर्जा, धैर्य आणि आत्मविश्वास अकोलेकरांमध्ये निर्माण व्हावी या दृष्टीने हा चार तासाचा कार्यक्रम
प्रभू रामचंद्राच्या साक्षीने करण्यात आला. ४१ वर्षापासून प्रभू रामचंद्राच्या प्रगट उत्सवात सेवा देणारे गिरीश जोशी यांच्या
संकल्पनेतून हा कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये मातृशक्ती मोठ्या संख्येने सहभागी होती. संस्थेच्या वतीने सहभागी मातृ शक्तीचा श्रीफळ व ब्लाउज पीस प्रसाद देऊन संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुमनदेवी अग्रवाल यांनी सत्कार केला. संस्थेचे उपाध्यक्ष विनायक शांडिल्य गुरुजी,
गिरीराज तिवारी, अनिल मानधने, हरीश चौधरी, राम ठाकूर, हेमंत शर्मा विजय अग्रवाल, अजय जोशी, महेश चौधरी, चंद्रशेखर खडसे आशादेवी गोइंका अजय गुल्हाने राम रतन सारडा, संजय अग्रवाल, प्रकाश भुसारी शीला तिवारी संजय जीरापुरे, बनवारीलाल बजाज किसन गोपाल पुरोहित, महेंद्र पुरोहित रमेश लड्डा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संध्या देशपांडे यांचाही सन्मान करण्यात आला.