ताज्या घडामोडी

 १७ मार्च “सालबर्डी” या चित्रपटामधील जगदंब गाण्याचा लॉन्च सोहळा दुपारी ३ वाजता शिवाजी पार्क, वीर सावरकर सभागृहात संपन्न झाला. अत्यंत दिमाखदार, भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने चित्रपटातील प्रमुख सर्वच कलाकार उपस्थित होते.

Akola B7

१७ मार्च “सालबर्डी” या चित्रपटामधील जगदंब गाण्याचा लॉन्च सोहळा दुपारी ३ वाजता शिवाजी पार्क, वीर सावरकर सभागृहात संपन्न झाला. अत्यंत दिमाखदार, भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने चित्रपटातील प्रमुख सर्वच कलाकार उपस्थित होते.

अतिशय सुरवातीला गोंधळाचा भव्य चौरंग मांडून, देवीचा मांड सजवून चौक भरला होता. गोंधळी समाजाचे एक वयस्कर कलावंत अतिशय सुंदर आवाजात त्याच्या सोबत एक मुलगा होता, ज्याने सुंदर संबळ वादन केले.

कार्यक्रम सुरु झाला होता. मी, विश्वास दोर्वेकर, राष्ट्रीय अध्यक्ष, विश्व गोंधळी परिषद संघटनेचा प्रमुख म्हणून निमंत्रित होतो. मी निमंत्रक यांना फोन केला. ते भेटण्यासाठी आलो. मला बसवून थोडे बोलणे झाले. कार्यक्रम नुकताच सुरुवात झाली होती. सत्कार वगैरे निवेदिका सर्वांचा, सालबर्डी मधील सर्व कलाकार यांची.

खरे तर मला उत्सुकता होती गोंधळी पाहण्याची, गोंधळी कोणी साकारला? आता पर्यंत गाण्याच्या ट्रेलरमध्ये नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील व त्याची टीम दिसत होती. शेवटी तो क्षण आला, ज्याची उत्सुकता होती.

पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पूजा सावंत फार रुबाबदार वाटते, उंची चांगली असल्यामुळे. आणि सालबर्डी मधील गाणे अजय गोगावले यांच्या आवाजातील गीत अंगावर शहारे आणणारे.

“अंधार मातला थोर, असा घनघोर गं जगदंबे… भव मायेची अवस दाटली… तुझ हरवलं बाळ गं बाळ… आई आता तूच सांभाळ, उंबऱ्यात बैसला टपून दैत्या, कुणी नाठाळ गं आई जगदंबे…”

प्रत्यक्ष गाणे पाहताना, अतिशय उंच स्वरात गीत गाऊन पुन्हा एकदा अजय गोगावले यांनी जगदंबेची मनापासून गायलेला आर्त स्वर—माहूर गडावर, तुळजापूरवासिनी, करवीर निवासिनी अंबाबाईच्या दारींहून, वणी गडावर, सप्तश्रुंगी मातेच्या डोंगरावर—पूर्ण महाराष्ट्रभर आवाज घुमल्यासारखा वाटला.

आणि “आई जगदंबे” घुमू दे! १९ मार्चपासून नवरात्री, कुलदेवीचा उपवास, आराधना रामनवमीपर्यंत अत्यंत पावन दिनी गाण्याचा शुभमुहूर्त. हे गीत महाराष्ट्रभर काना-कोपऱ्यात जाणार.

आणि डोळ्याचे पारणे फिटावे असा प्रथम जो आता पर्यंत एक युवा म्हणून गोंधळी समाजाची चळवळ चालवताना, स्वराज्य ते स्वातंत्र्य काळात गोंधळी ही भूमिका महत्वाची होती. कसा असेल तो गोंधळी? जो गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना खबरबात देणारा गोंधळी सालबर्डी चित्रपटात पाहण्यास मिळाला.

हा योगायोग? की जगदंबेचा साक्षातकार? असा प्रेक्षक म्हणून मला प्रत्यक्ष पाहताना जाणवला.

प्रसिद्ध पोवाडेकार बाबासाहेब देशमुख यांचा “गड आला पण सिंह गेला” हा पोवाडा १९८० च्या दशकात, कुठे ही चौक यात्रा मध्ये—हॉटेलवाले लाउडस्पीकरवर मोठ्या आवाजात लावायचे. लोक झाडाखाली जागा मिळेल तिथे बसून उभे राहून संपूर्ण पोवाडा ऐकायचे. तो प्रसंग जिवंत करण्याची ताकद त्यात असते.

या प्रसंगामध्ये शिलेदार तानाजी मालुसरे हे गोंधळी का बनले? त्या गावात गेले, मग त्या गावच्या कोणालाही त्यांना पाहून काही संशय आला नाही. गोंधळी गोंधळ ही चांगली करत होती, कारण सोबती जातिवंत गोंधळी होते.

याचाच अर्थ—गोंधळी त्यावेळेचे रुबाबदार राहण्याची जन्मजात गुण गोंधळी जोशी वासुदेव समाजात उपजत आहे, हणून यांचा प्रमुख गोंधळी आहे.

शक्तीची उपासना, पूजाविधी, गाऱ्हाणं—साक्षात भगवती आदिमाया शक्तीला बोलविण्याचा अधिकार गोंधळी यांचाच.

या चित्रपट निमित्ताने गोंधळी अतिशय देखणा, रुबाबदार, शरीरयष्टी, पिळदार, विशाल दंड, छातीचा गश्मीर महाजनी यांनी गोंधळी सकारात्मक साकारला.

त्याच्या रूपात माझ्या मनात असलेला गोंधळी प्रत्यक्ष अनुभवला. यामध्ये अतिशयोक्ती किंवा अंधश्रद्धा नाही. गेल्या अनेक वर्ष गोंधळी समाजाची भटके विमुक्त चळवळीत असल्यामुळे, माझ्या समाजाचा इतिहासाबद्दल अनेक पुस्तके वाचण्यात आली.

इतिहासातील प्रसंग “सालबर्डी” चे गीत पडद्यावर पाहून मंत्रमुग्ध झालो. नंतर नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांना गाठले आणि प्रश्न विचारला.

मी गोंधळी समाज अध्यक्ष म्हणून परिचय दिला. त्याला खूप आनंद वाटला. मी म्हणालो, “गोंधळी म्हणून तू गश्मीर महाजनी याची निवड केली?” तर त्याने उत्तर नाही, म्हणून माझे ते काम आहे, माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

हे गीत ऐकून मी खूप आनंदित झालो. जगदंबे ने माझी निवड यागाण्यासाठी झाली. मी एक महिना माझी टीम सतत रियाज करत होतो या गाण्यासाठी.

संबळ ५ पोती, भंडारा, हळद, शिवाय कवड्याच्या माळा आणि आई जगदंबा—अर्थात तीच आपल्याला बळ देते.

त्यांनी मला प्रश्न केला, “तुम्हाला कसे वाटले?” मी त्याचे आधी आभार व्यक्त केले. गोंधळी खूप सुंदर वाटला, रुबाबदार गोंधळी, अतिशय शक्तीचा साक्षातकार झाल्यासारखे वाटले.

आशिष पाटील आपल्या नृत्यकलेबाबत जागरूक वाटला, अभ्यासू वृत्ती जाणवत होती. मी अभिनंदन, शुभेच्छा व आशीर्वाद दिला.

आणि मेन रोल “सालबर्डी” चित्रपटातील जगदंबा गाण्यातील गोंधळी साकारनारा गश्मीर महाजनी व पूजा सावंत यांच्या भोवती पत्रकारांच्या मुलाखती चालू होत्या. मी ती सर्व ऐकत होतो.

गश्मीर अत्यंत भावुक होऊन सर्व त्याच्या सोबत—ज्यांनी गोंधळी ही भूमिका साकारत असताना सोबतच्या सर्व महिला नृत्य करत होत्या, त्या सर्वांनी या सर्व शक्ती आहेत, हे तो प्रामाणिक हात जोडून स्वीकारले.

एक अभिनेता म्हणून मला गश्मीर खूप नम्र वाटला, त्याच्या आईबद्दल भावुक वाटले.

खरोखर मराठी चित्रपटसृष्टीचा शापित राजहंस, रविंद्र महाजनी यांचा हा मुलगा अतिशय जबाबदार मुलगा आहे.

एकाच चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते, स्वराज्याचे मोठे धनी व धाकले धनी—दोन्ही भूमिका साकारनारा अभिनेता गश्मीर महाजनी. काही ठिकाणी तो खूप जबाबदार व्यक्तिमत्त्व वाटतो. त्याला पाहताना रविंद्र महाजनी मराठीचा विनोद खन्ना होता.

ज्या प्रकारे अक्षय खन्नाची वापसी झाली—छावा आणि धुरंधर. मला गश्मीर पाहताना तसे वाटले. या चित्रपटानंतर गश्मीरची वापसी खूप मोठी होणार.

आणि गश्मीर समोर मी गोंधळी समाज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझा परिचय देऊन प्रश्न केला, “गोंधळी ही भूमिका करताना तुमच्या डोळ्यासमोर काय होते? आपण एक गोंधळी जसा असतो तसा?”

मी एक गोंधळी म्हणून माझा प्रश्न जवाबदारीने विचारला.

तो एकदम थोड्या वेळासाठी, अचानक—असा प्रश्न होणार, त्याला कदाचित अपेक्षित नव्हते.

मी म्हणालो, “गश्मीरजी, गोंधळी हा आदिशक्ती भगवतीला आव्हान करतो, गोंधळ ही विधी पूजा आहे.”

गोंधळी होताना ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराजानी—भावविभोर होऊन, दार उघड बये दार उघड.

स्वराज्यावर संकट आले असताना डोळे बंद करून दरवाजा लावून बसलीस. दार उघड बये दार उघड.

मी असा प्रश्न केला.

गश्मीर महाजनी यांनी उत्तर दिले, “सर, तुम्ही याचे दांडगे, अनुभवी दिसता. खरे तर तुम्ही तुमच्या समाजात यावर बोलून चर्चा करायला हवी. युवा यांपर्यंत पोहोचायला हवे.”

हा चित्रपट स्पेशल गोंधळी समाजावर नाही. भविष्यात गोंधळी समाजावर चित्रपट बनणार, तर मी आधी तुमचे नाव देणार.

अतिशय मार्मिक उत्तर देऊन गश्मीर महाजनी माझ्याशी हात मिळवत होता. बाजूला उभी होती पूजा सावंत.

खरं तर हे गीत तिच्यामुळे तयार झाले. हे गीत अजय यांनी गाऊन पाठवले. ते ऐकून ती प्रभावीत झाली. तिने हे गीत गश्मीरला पाठविले. त्यालाही ते खूप आवडले.

त्याने सांगितले, “नृत्यदिग्दर्शक माझ्या आवडीचा लागेल,” आणि मग आशिष पाटील नृत्यदिग्दर्शक म्हणून गीताला छान न्याय दिला.

मी मात्र या निमित्ताने “सालबर्डी” चित्रपटामुळे माझ्या समाजाचा रुबाबदार गोंधळी—गश्मीर महाजनी, गायक अजय गोगावले, संगीत पद्मनाभ गायकवाड, नृत्य आशिष पाटील, पूजा सावंत—तर या सर्वा मागे ज्या आदिशक्तीची कृपा आहे, ती चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता व त्यांची टीम. मी सर्वाना धन्यवाद देतो.

शिवाय हा चित्रपट सर्वांनी थिएटरमध्ये पाहावा, असे आवाहन मी, राष्ट्रीय अध्यक्ष विश्वास दोर्वेकर, विश्व गोंधळी परिषद वतीने, हात जोडून करतो.

🙏🙏 आई राजा उदे उदे!

💐💐 सर्वांना चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा 🙏🙏

गोंधळी समाजावर, गोंधळी या पात्रावर चित्रपट यावा—ही भावना!

मी आणि माझी टीम—प्रदेश अध्यक्ष अनिल दोर्वेकर, गणेशराव इंगोले सर, दशरथदादा धुमाळ, प्रमोददादा दोर्वेकर, संपादक अध्यक्ष सतीशदादा पवार, युवा स्वप्नील दोर्वेकर, निलेश दोर्वेकर, अमोल गिते, अमोल पाचपोर, चंद्रकांत महाजन, सचिन वाघमारे, राहुल मोरे, प्रेम वाघळकर, रवींद्र वाघळकर, महिला रणरागिणी ज्योतीताई शिंगणाद, सौ रजनी दोर्वेकर, adv ऐश्वर्या दोर्वेकर, डॉ. योगिनी दोर्वेकर व सर्व महिला भगिनी—माता आदिशक्तीचा जागर होऊ द्या! आई राजा उदो उदो!

🚩🚩 सालबर्डी 🚩🚩

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.