ताज्या घडामोडी

राज्यभर खळबळ उडविणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात लैंगीक शोषण प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण

Akola B7 News

 आरोनाशिक : राज्यभर खळबळ उडविणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात लैंगीक शोषण प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण लागले आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला चांगल्या संततीसाठी पूजा गरजेची असल्याचे सांगत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आणखी एक तर अन्य एका विवाहितेवर बलात्कारानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याचा दुसरा गुन्हा रविवारी (दि. २२) नाशिक पोलिसांनी दाखल केला. त्यामुळे विकृत खरात याच्यावर महिला अत्याचाराचे आता एकूण तीन अत्यंत गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, खरात याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने आपल्या गुन्हांची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह फार्म हाऊस कर्मचारी आणि आठ जणांची एसआयटी पथकाकडून सखोल चौकशी करण्यात आली.

खरातच्या दुष्कृत्यांचा आणि विकृतीचा आणखी एक पुरावा पुढे आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नरबळी व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले असून, त्यात खरातच्या विकृतीची परिसीमा गाठली गेली आहे. फिर्यादीनुसार, अशोक एकनाथ खरात (६७) याने कॅनडा कॉर्नरच्या ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात गर्भवती महिलेवर “पूजा विधी’च्या नावाखाली अमानुष अत्याचार केले. दरम्यान, याप्रकरणात चाकणकर यांना अटक करण्याची मागणी होत आहे.विवाहानंतरसुद्धा बलात्कार, गर्भपातयासंदर्भात अन्य एका पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार विकृत अशोक खरात याने तिचा विवाह झाल्यानंतरही वारंवार बळजबरी केली तसेच त्यानंतर गोळ्या देऊन गर्भपातही केल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे. रविवारी ३३ वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात हजर राहून आपल्यावरील आपबिती कथन केली. त्यात तिने धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानुसार सन २०१३ मध्ये विवाह जुळविण्याच्या काळात तिच्या कुटुंबीयांनी ओळखीच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून खरातचा सल्ला घेतला होता. यावेळी खरात याने स्वतःला ज्योतिषी व ‘अवतारी पुरुष’ भासवून संबंधित महिलेचा विश्वास संपादन केला. विवाहानंतरही कौटुंबिक अडचणींवर उपाय सांगण्याच्या नावाखाली तो संपर्कात राहिला. लग्न मोडल्यानंतर दुसरे लग्न करण्यासाठीही खरातने पुन्हा महिलेला बोलावून घेत तीच्यावर अत्याचार केला.कर्मचाऱ्यानेच केला भोंदूच्या कारनाम्यांचा भंडाफोडभोंदू आणि विकृत अशोक खरात याच्या अघोरी कारवायांचा भांडाफोड त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळेच झाल्याचे वृत्त आहे. खरातच्या स्त्री लंपटपणाविषयी तक्रारी कानावर येऊ लागल्यानंतर त्याचा संशय बळावला. त्याने बाबाच्या दालनात स्पाय कॅम बसवले आणि त्यात बाबाचे चाळे कैद केल्याचे पुढे येत आहे. हा प्रकार कळल्यानंतर खरातने त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व त्याने संबंधित पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केल्याचे सांगण्यात येते.नकली साप आणि वाघाचे कातडे…

आरोपी खरात नकली साप व वाघाचे कातडे वापरून लोकांमध्ये भीती निर्माण करत असे. रिमोटवर चालणारा हा साप हालताना दिसल्यावर उपायांसाठी येणाऱ्यांना अदभूत वाटत असे.प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटणारमुंबई: भोंदूबाबा अशोक खरात याच्या दृष्कृत्यांची चर्चा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या मुद्यावर सोमवारी विधिमंडळात विरोधक आक्रमक होतील.दैवीशक्तीचा दावा करणारा खरात म्हणाला, बोलायलाही शक्ती नाही!आपल्याकडे दैवी शक्ती असल्याच्या मोठमोठ्या बढाया मारणारा भोंदू खरात याला रविवारी नाशिक पोलिसांनी खाक्या दाखवला. ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ या गाजलेल्या पॅटर्न नुसार रविवारी सायंकाळी चौकशी प्रसंगी खरात याची ‘वरात’ काढली गेली. यावेळी एक-दोन वेळा क्षीण आवाजात कसेबसे ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणताना खरात याने आपल्यात बोलायची ताकदही नसल्याचे सांगितले. याची चित्रफीत व्हायरल झाली असून सर्व स्तरातून त्याबाबत पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत होत आहे. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे पोकळ दावे करणाऱ्या भोंदू खरात याला आता पोलिसांसमोर बोलण्याची शक्ती सुद्धा न उरल्याच्या प्रतिक्रिया त्यानंतर व्यक्त होत आहेत.कुणाला सोडणार नाही : मुख्यमंत्रीनागपूर : भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण अत्यंत गंभीर असून गुप्तचर माहितीच्या आधारे राज्य सरकार आणि पोलिसांनीच नियोजनबद्ध पद्धतीने या प्रकरणाचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणाला विरोधकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. विरोधी पक्षातील कोण कोण खरातकडे गेले होते, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिल

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.