ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या पिक कर्ज भरणा करिता 31 मार्च ऐवजी 30 जून तारीख निर्धारित करा आमदार सावरकरांची सभागृहामध्ये सहकार खात्याच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्याच्या वेळी शासनाकडे मागणी

Akola B7

शेतकऱ्यांच्या पिक कर्ज भरणा करिता 31 मार्च ऐवजी 30 जून तारीख निर्धारित करा आमदार सावरकरांची सभागृहामध्ये सहकार खात्याच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्याच्या वेळी शासनाकडे मागणी

 

* शेतकरी पीक कर्ज घेताना त्या कर्जाची परतफेड शेतकऱ्याला 31 मार्च पूर्वी करणे बंधनकारक आहे घेतलेल्या कर्जाची मुदत लक्षात घेता १२ महीने कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच शेतकऱ्याला कर्ज भरणा करावा लागतो अन्यथा शेतकरी थकीत होतो , मार्च अखेर व्यावसायिक लोकांकडून देणे घेणे भरणे बँकांना अंतिम करावयाचे असते अशा त्याचवेळी शेतकऱ्यांना सुद्धा कर्जाचा भरणा करावा लागतो या परिस्थितीमध्ये व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी रास्तभावात होत नसल्याचा अनुभव आहे, नाईलाजाने शेतकऱ्यांना पडेल त्या भावात शेतमाल विकावा लागतो शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्याकरिता कर्ज फेडीची मुदत 31 मार्च ऐवजी 15 जून किंवा 30 जून करावी अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सहकार खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली. तसेच राज्यांमध्ये सेवा सहकारी सोसायटीचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे सेवा सहकारी सोसायटी यांना ग्रामीण भागात महसूल विभागाकडून 500 ते 1000 स्क्वेअर फुटाचा जागा विनामूल्य देण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी सेवा सहकारी सोसायटी कार्यालय बांधता येतील अशी सावरकरांनी मागणी केली ,तसेच शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत तीन लाख ते पाच लाखापर्यंत मर्यादा आखून दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा व्यवहार बचत खात्यात न ठेवता किसान क्रेडिट कार्ड मध्ये ठेवण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांना पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या प्रमाणात पैसे काढता येतील किंवा भरणा करता येतील असे सुद्धा सावरकरांनी शासनाला सुचवले,

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.