ताज्या घडामोडी
पुण्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह सापडला, कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गेल्याचे निष्पन्न
Akola B7
पुण्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह सापडला, कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गेल्याचे निष्पन्न
पुण्यातील चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात शोभा विजय वाघमारे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. १६ मार्चच्या मध्यरात्री आंबेठाण चौकात ही घटना घडली. सहा कुत्र्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आणि अतिरक्तस्रावामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे कुत्र्यांच्या हल्ल्याचे वास्तव समोर आले.