ताज्या घडामोडी

गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब जयंती साजरी

Akola B7 ज्ञानेश्वर निखाडे

गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब जयंती साजरी

 

अकोला गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट व भगवान रविदास कम्युनिटी फेडरेशन संयुक्त विद्यमाने बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांची जयंती महारुद्र मंदिर खेडकर नगर अकोला येथे काल दिनांक 15 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग वाडेकर लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री.मधुकर वानेडकर ,अकोला जिल्हा महिला संघटना अध्यक्ष सौ.शारदा वानरे आणि संस्थेचे उपाध्यक्ष श्री.निरंजन गव्हाळे विचारपीठावर उपस्थित होते.मान्यवरांनी बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन केले. विचारपीठावरील सर्व पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मा.मधुकर वानेडकर ह्यांनी केले सोबतच बहुजन समाज पार्टी, बामसेफ व बुद्धिस्ट रिसर्च सेंटर सस्थापक नायक मा. कांशीराम साहेब ह्यांना अभिवादन करत त्यांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या परिवर्तन वादी चळवळीच्या कार्याला आपल्या विचारातून उजाळा दिला भारत देशाच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात बहुजन समाजाकरिता सन्मानचे स्थान प्राप्त करून देण्यामागचा त्यांचा संघर्ष आणि त्याग आपल्या विचारातून प्रगट करत समाजाला त्याच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आव्हान केले.त्यानंतर उपस्थित रोसा चे जिल्हा संयोजक प्राध्यापक गजानन पद्मने सर ह्यांनी आपल्या विचारातून मा. काशीरामजी ह्यांचा बहुजन समाजाच्या हक्क,न्याय आणि परिवर्तन करिता केलेल्या प्रेरणादायी जीवनकार्याला उजाळा देत त्यांना अभिवादन केले.संस्था सदस्य मा.राखोंडे ह्यांनी बहुजन नायक मा. काशीरामजी ह्याच्या जीवनातील देशहीताकरिता कार्याची माहिती देऊन आपले विचार व्यक्त केले. सौ. शारदा वानरे ह्यांनीही महानायक मा.काशीरामजीना विचारातून अभिवादन केले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पांडुरंग वाडेकर ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. काशीरामजी साहेब ह्यांच्या संपूर्ण जीवनाकार्याला इतिहास कधीही विसरू शकणार नाही तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब ह्यांचे खरे अनुयायी म्हणून समाजभूषण मा. काशीराम ह्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लक्ष्मण पदमने, महादेव पदमने, किसनराव पदमने, सुधाकर इंगळे, महादेव इंगळे, गजानन काकडे, प्रल्हाद शेगोकार अरुण भटकर भास्कर शिरभाते, ईशान चापके,गजानन वानरे, गजानन वाडेकर,आदिनाथ गाडेकर सौ.सखुबाई वानेडकर, ज्ञानेश्वर पदमने,श्रीराम इंगळे,सौ दिपालीताई राखोंडे,सौ. दीप्तीताई वानेडकर सौ. विद्याताई वानेडकर तसेच इतर सर्व समाज बांधव लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था सचिव श्री. मधुसूदन गव्हाळे ह्यांनी केले तर आभारप्रदर्शन संस्था सदस्य राम शेगोकार सर ह्यांनी केले.अशाप्रकारे अल्पोहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.