ताज्या घडामोडी
गॅस टंचाईचा शिर्डीला मोठा फटका, साईबाबांचे लाडू प्रसाद अनिश्चित काळासाठी बंद
गॅस टंचाईचा शिर्डीला मोठा फटका, साईबाबांचे लाडू प्रसाद अनिश्चित काळासाठी बंद
आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका शिर्डीच्या साईबाबा मंदिर ट्रस्टला बसला आहे. गॅसचा साठा मर्यादित असल्याने भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधन बचतीसाठी संस्थानने प्रसादालयाच्या मेन्यूमध्येही बदल केला आहे. गॅस टंचाईचा विचार करून संस्थान प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.